IPL 2025 Schedule : पहिल्या सामन्यात कोणामध्ये लढत, कोणते संघ येणार आमने-सामने? जाणून घ्या

IPL 2025 Schedule : पहिल्या सामन्यात कोणामध्ये लढत, कोणते संघ येणार आमने-सामने? जाणून घ्या

IPL चे सामने कधी सुरु होणार आणि कुठे पाहता येणार? याबद्दल जाणून घ्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

देशभरात आता आयपीएल 2025 ची क्रिकेटरसिक आतुरतेने वाट बघत आहेत. यावर्षीचे सामने 22 मार्च 2025 पासून सुरु होणार आहेत. या वर्षीचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये ईडन गार्डनवर होणार आहे. तसेच यावेळचा अंतिम सामनाही 25 मे रोजी ईडन गार्डनवर खेळला जाणार असल्याचे समोर आले आहे.

आयपीएल सामने 10 मैदानांवर खेळवले जाणार आहेत. गुवाहटी आणि धर्मशाळा येथेही सामने खेळवले जाणार आहेत. राजस्थान येथे 26 आणि 30 मार्च गुवाहटीमध्ये केकेआर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना होणार आहे. तसेच अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, लखनऊ, मुल्लानपूर, दिल्ली आणि जयपूर या ठिकाणीदेखील सामने खेळवले जाणार आहेत.

आयपीएल खेळाचे वेळापत्रक लवकरच समोर येणार आहे. मात्र या सामन्यांच्या काही अनधिकृत तारखा समोर आल्या आहेत. समोर आलेल्या तारखांनुसार, 12 जानेवारी रोजी मुंबईमध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी 23 मार्च 2025 पासून आयपीएल सामने सुरु होतील असे संकेत दिले होते. त्यामुळे आता लवकरच सामन्यांचे वेळापत्रक काही दिवसांत समोर येईल अशी माहिती समोर येत आहे.

सामने कुठे पाहता येणार?

जिओ सिनेमाने 2023 पासून पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचे डिजिटल राईट्स 3 मिलियन डॉलर्सना विकत घेतले होते. 2023 पासून जिओ सिनेमाने मोबाईलवर मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु केले. मात्र 2025 मध्ये चाहत्यांना संपूर्ण सामना पाहण्यासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागेल. परंतु रिलायन्सने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com