Ishant Sharma IPL 2025 : इशांत शर्माला 'ती' चूक पडली भारी, BCCIची मोठी कारवाई

Ishant Sharma IPL 2025 : इशांत शर्माला 'ती' चूक पडली भारी, BCCIची मोठी कारवाई

इशांत शर्मा IPL 2025: बीसीसीआयने कारवाई करत इशांतला दंड ठोठावला, मैदानावरील अयोग्य वागणुकीमुळे.
Published by :
Prachi Nate
Published on

सध्या आयपीएल 2025 चा महासंग्राम पाहायला मिळत आहे. अशातच काल गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना पार पडला या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांनी हैदराबादला 152 धावांवर ढेर झाला आहे. त्यामुळे गुजरातसमोर 153 धावांच आव्हान देण्यात आलं होत. ज्यात गुजरातने 7 विकेट्ससह हा सामना जिंकला आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 4 सामने खेळले असून त्यांचा हा सलग तिसरा विजय आहे, तर हैदराबादचा हा चौथा पराभव ठरला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

इशांत शर्माला BCCI चा दणका

यादरम्यान गुजरातचा सर्वात महागडा खेळाडू इशांत शर्मा याच्यासंबंधीत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कालच्या सामन्याच्या विजयानंतर बीसीसीआयने इशांतवर कारवाई करत दंड ठोठावला आहे. इशांत शर्माने सामन्यादरम्यान मैदानावर अयोग्य वागणूक केली, ज्यामुळे बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर IPL आचारसंहितेनुसार 2.2 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. तसेच आयपीएलने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये त्याने नेमकी कोणती चुक केली हे स्पष्ट केलं नाही. त्यांनी एवढचं स्पष्ट केलं की, इशांतने त्याच्या गैरवागणुकीचा गुन्हा कबुल केला आहे. त्यामुळे शिक्षा म्हणून, त्याला त्याच्या सामन्याच्या मानधनातील 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

इशांत शर्माची आयपीएल 2025 मधील आतापर्यंतची कामगिरी

इशांतने आयपीएल 2025 गुजरात टायटन्सकडून 3 सामने खेळले आहेत, मात्र त्याची कामगिरी काही खास पाहायला मिळाली नाही. इशांत हा गुजरातसाठी इम्पॅक्ट गोलंदाज म्हणून ओळखला जात असला तरी सनरायझर्स हैदराबादविरुद्धची त्याची कामगिरी प्रभावशाली नव्हती. त्याने 4 ओव्हरमध्ये 53 धावा दिल्या एवढचं नव्हे तर त्याने एकही विकेट घेतली नाही. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात इशांतने 1 विकेट घेतली आहे. इशांतने 2008 मध्ये आयपीएलमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर् या संघांमध्ये खेळला आहे. तर गुजरात टायटन्स हा त्याचा सातवा संघ आहे

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com