Jasprit Bumrah: बुम बुम बुमराहचा कहर! बॉक्सिंग डे कसोटी आधीच विक्रमी कामगिरी

Jasprit Bumrah: बुम बुम बुमराहचा कहर! बॉक्सिंग डे कसोटी आधीच विक्रमी कामगिरी

जसप्रीत बुमराहने बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी विक्रमी कामगिरी केली आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत 900 हून अधिक रेटिंग पॉइंट्स मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

२६ डिसेंबरपासून मेलबर्नला चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. भारतीय संघ बॉक्सिंग डे टेस्टसाठी सज्ज झाला आहे. या सामन्याआधी आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या नव्या विक्रमासह झळकत आहे. भारतीय संघाचा जलद गोलंदाज आणि कर्णधार जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्नमध्ये आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात 9 विकेट घेत चांगली कामगिरी केली होती.

त्यामुळे कसोटीच्या इतिहासात सर्वात रेटिंग पॉइंट्स मिळवणारा जसप्रित बुमराह पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 900 हून अधिक रेटिंग पाँइंट्स मिळणाऱ्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत जसप्रित बुमराह पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे, तर आर अश्विननंतरचा दुसराच भारतीय आहे.

जसप्रित बुमराहचा रेकॉर्ड

ब्रिस्बेन कसोटीत 9 विकेट्स घेतल्यामुळे त्याच्या रेटिंग पाँइंट्समध्ये 14 पाँइंट्सची वाढ झाली आहे. त्याचे रेटिंग पाँइंट्स 904 इतके झाले आहेत. पण ब्रिस्बेन कसोटीत त्याने घेतलेल्या 9 विकेट्समुळे आता त्याच्या रेटिंग पाँइंट्समध्ये 14पाँइंट्सची वाढ झाली आहे. त्याचे 904 रेटिंग पाँइंट्स झाले आहेत. त्यामुळे बुमराह कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत 900हून अधिक रेटिंग पाँइंट्स मिळणारा आर अश्विननंतरचा दुसराच भारतीय आहे, तसेच पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com