MI vs RCB IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मुंबईचा हुकमी एक्का त्याच्या राज्यात परतला
उद्या म्हणजे सोमवारी 7 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता रंगणार आहे. या सामन्याआधीच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईचा हुकमी एक्का ताफ्यात परतला आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार आणि भेदक गोलंदाज जसप्रीत बुमराह हा पुन्हा मुंबई इंडियन्स संघात परतला असल्याची माहिती मुंबई इंडियन्स या संघाने त्यांच्या ऑफिशीअल सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत दिली आहे. त्याचसोबत त्यांनी "जंगलाचा राजा त्याच्या राज्यात परतला आहे." असं कॅप्शन दिलं आहे.
जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान 4 जानेवारीला दुखापतग्रस्त झाला होता. यादरम्यान बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. ज्यामुळे पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकला होता. त्याचसोबत तो आयपीएल 2025 सुरुवातीच्या काही सामन्यात खेळताना दिसला नाही. मात्र आता सोमवारच्या आरसीबी विरुद्धच्या सामन्यासाठी बुमराहने पुन्हा मुंबई इंडियन्स संघात कमबॅक केला आहे. त्यामुळे सोमवारचा बंगळुरू विरुद्ध मुंबई हा सामना अधिक रंगत ठरणार आहे.