Joe Root : क्रिकेटमध्ये नवा इतिहास; राहुल द्रविडचे 2 रेकॉर्ड मोडत इंग्लंडचा फलंदाज अव्वल स्थानावर
Joe Root : क्रिकेटमध्ये नवा इतिहास; राहुल द्रविडचे 2 रेकॉर्ड मोडत इंग्लंडचा फलंदाज अव्वल स्थानावर Joe Root : क्रिकेटमध्ये नवा इतिहास; राहुल द्रविडचे 2 रेकॉर्ड मोडत इंग्लंडचा फलंदाज अव्वल स्थानावर

Joe Root : क्रिकेटमध्ये नवा इतिहास; राहुल द्रविडचे 2 रेकॉर्ड मोडत इंग्लंडचा फलंदाज अव्वल स्थानावर

जो रूटचा विक्रम: राहुल द्रविडचे दोन रेकॉर्ड मोडत इंग्लंडचा फलंदाज अव्वल स्थानावर.
Published by :
Team Lokshahi
Published on

Joe Root Breaks 2 Records of Rahul Dravid To Top Spot : इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूट ने भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये तिसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकले. त्याच्या या शतकासह त्याने दोन नवे रेकॉर्ड सुद्धा बनवले. त्याने भारतीय क्रिकेटर राहुल द्रविडच्या नावे असलेला विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. जो रुटने इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टेस्ट सिरीजमध्ये सार्वधिक कॅच पकडण्याचा रेकॉर्ड स्वतःच्या नावे केला. हा रेकॉर्ड पहिले भारतीय क्रिकेटर राहुल द्रविड याच्या नावे होता. त्यामुळे आता राहुल द्रविड 210 कॅचसह दुसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. इतकेच नव्हे तर त्याने राहुल द्रविडचा दुसराही रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीवर जो रुटने दमदार चौकार मारत आपले विजयी शतक झळकावले.

रुटने कसोटी सामन्यामध्ये 37 वे शतक ठोकत येथेही आपलेच नाव कोरले. टेस्ट सिरीजमध्ये 37 वे शतक पूर्ण करत राहुल द्रविडला मागे टाकले आहे. राहुल द्रविडने आतापर्यत 36 शतक टेस्ट सिरीजमध्ये ठोकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा रेकॉर्ड भारताचा स्टार माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावे आहे. त्याने आतापर्यत 51 शतके झळकावली आहेत. जो रुटने राहुल द्रविडच्या दोन विक्रमांना मागे टाकत दोन नवीन रेकॉर्ड आपल्या नावे केले. या अनुभवी फलंदाजाने आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीने दोन रेकॉर्डवर यशस्वीपणे आपले नाव कोरले.

हेही वाचा...

Joe Root : क्रिकेटमध्ये नवा इतिहास; राहुल द्रविडचे 2 रेकॉर्ड मोडत इंग्लंडचा फलंदाज अव्वल स्थानावर
KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com