पहिल्याच सामन्यात RCB ने KKR चा उडवला धुव्वा, कर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले पराभवाचे कारण
काल आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात झाली. यामध्ये रॉयल बंगळुरू चॅलेंजर्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना पार पडला. यामध्ये RCB ने KKR चा सात विकेट्सने पराभव केला. केकेआरने सुरुवातीला फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांनी चांगली खेळी करत 103 धावांची भागीदारी केली. त्यानंतर KKR ने RCB ला 175 धावांचे लक्ष्य दिले.
पहिल्या सामन्यात KKR हरल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेवर टीका केली जात आहे. दरम्यान त्याने याबद्दल भाष्यदेखील केले. तो म्हणाला की, "आम्ही 13व्या षटकापर्यंत चांगला खेळ करत होतो, पण 2-3 विकेट्सने सामन्याचा मार्गच बदलून टाकला. नंतर आलेल्या फलंदाजांनी अथक प्रयत्न केले, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. जेव्हा मी आणि व्यंकटेश अय्यर फलंदाजी करत होतो, तेव्हा आम्ही 200-210 च्या धावसंख्येचा विचार करत होतो. मात्र एकामागोमाग एक विकेट्स गेल्याने परिणाम झाला".
कोलकाता संघाने 10व्या षटकात एक विकेट गमावून 107 धावा केल्या होत्या. संघाची धावसंख्या 10 षटकांत 100 ओलांडली होती, त्यामुळे 200 धावसंख्या पूर्णपणे शक्य वाटत होती. काही वेळातच KKR संघाने पुढील 43 धावांत पुढील 5 विकेट गमावल्या होत्या.शेवटी टीम केवा केवळ 174 धावांपर्यंत पोहोचू शकली. अखेरच्या 10 षटकांत संघाला केवळ 67 धावा करता आल्या.