Kundatai On Wankhede Stadium Exclusive: 'वानखेडे'ला 50 वर्षे पूर्ण, कुंदाताईंकडून आठवणींना उजाळा
नागपूरचे सुपुत्र असणाऱ्या बॅरिस्टर शेषेराव वानखेडे यांनी मुंबईत भव्य वानखेडे स्टेडियम बांधले, आता त्या स्टेडियमवर आज मोठे मोठे सामने पाहायला मिळत आहे, त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या तसेच मंत्र्यांच्या शपथविधी देखील या स्टेडियमवर पाहायला मिळत आहेत. अशा ऐतिहासिक वास्तूला म्हणजेच वानखेडे स्टेडियमला उद्या या 50 वर्ष पुर्ण होत आहे. मराठी माणसाच्या अपमानाला उत्तर म्हणून वानखेडे स्टेडियम तेरा महिन्यात बांधून उभे करण्यात आले आहे.
त्यावेळी काही टिकाकार म्हणायचे की, हे स्टेडियम घाईघाईने बांधल्याने ते कोसळेल पण पन्नास वर्षे झाले तरी वानखेडे स्टेडियम दिमाखात उभे आहे अशी प्रतिक्रिया दिवंगत बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची मुलगी कुंदा विजयकर यांनी दिली आहे. वानखेडे स्टेडियम पुर्ण झाल्यावर या स्टेडियम मधील षटकार मारला तर बॅाल थेट मरिन लाईन्सच्या रुळावर जाईल आणि फिल्डरला बॅाल घ्यायला रेल्वे रुळावर जावे लागेल अशी टीकाही तेव्हा झाली होती, असे कुंदा विजयकर यांनी सांगितले.
पण रेल्वे रुळावर बॅाल गेला तर दहा हजार रुपये बक्षिस अशी घोषणाही बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी त्याकाळी केली होती. वानखेडे यांच्या हयातीत एकदाही बॅाल रेल्वे रुळावर गेला नाही . त्याच्या जाण्यानंतर एकदा क्रिकेटर संदिप पाटील यांनी लावलेला सिस्करचा बॅाल रुळावर केला होता अशी आठवण कुंदा विजयकर यांनी सांगितली. कुंदा विजयकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी.
मुंबईत भव्य वानखेडे स्टेडियम बांधला कसा? काय म्हणाल्या कुंदाताई
कुंदाताई म्हणाल्या की, ज्यावेळेस मुंबईत भव्य वानखेडे स्टेडियम बांधला त्यावेळेस बाबा हे विधानसभेचे स्पीकर होते, आणि त्यावेळेस की मंत्री होते ज्यांना फ्रेंडली मॅच खेळायची होती... त्यावेळेस बाबा स्पीकर ही होते आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते... त्यावेळेस त्यांना हे सगळे लोक मास्टर विजय मर्चंट यांच्याकडे घेऊन गेले... आणि विजय मर्चंट यांना रिकवेस्ट केली की, त्यांना सीसीआयला म्हणजे स्टेडियमवर एक फ्रेंडली मॅच खेळू द्यावी... पण त्यांनी परवानगी दिली नाही, त्यावेळेस त्यांना समजवण्यात देखील काहीच अर्थ नव्हता म्हणून मग बाबा म्हणाले की, आम्ही आमच्या स्टेडियमवर मॅच खेळू....
एक मराठी माणूस देखील स्टेडियम बांधू शकतो असं त्यांना दाखवण्यासाठी बाबांनी स्टेडियम बांधला, त्यावेळेस मुख्यमंत्री असलेले वसंतराव नाईक हे बाबांचे चांगले मित्र होते... त्यामुळे बाबांनी त्यांना सांगितलं की आम्हाला ही जागा हवी आहे, कारण ती जागा सरकारची होती... त्यावेळी त्यांना देखील थोडी शंका होती की हे खरचं तिथे स्टेडियम बांधणार आहेत का? पण बाबांनी त्यांना सांगितलं की त्यांना ती जागा हवीचं आहे आणि त्यांनी ती जागा स्टेडियमसाठी दिली. ही आठवण कुंदाताईंनी लोकशाही मराठी सोबत संवाद साधत असताना सांगितलं आहे.