Dickie Bird
Dickie Bird

Dickie Bird : प्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन

वयाच्या 92 व्या वर्षी निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • प्रसिद्ध अंपायर डिकी बर्ड यांचे निधन

  • कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्यांनी अंपायर म्हणून मोठे योगदान

  • 1970 मध्ये त्यांची पहिल्यांदा अंपायर म्हणून मैदानात उभे राहत कारकीर्दीची सुरुवात

( Dickie Bird ) क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय अंपायर डिकी बर्ड यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्यांनी अंपायर म्हणून मोठे योगदान दिले आहे. 1956 मध्ये यॉर्कशायरकडून फलंदाज म्हणून त्यांची क्रिकेट कारकीर्द सुरू झाली होती.

प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 93 सामने खेळले, 2 शतके झळकावली आणि सर्वोत्तम 181 नाबाद धावा केल्या. पण 1964 मध्ये दुखापतीमुळे त्यांचा खेळाडू म्हणून प्रवास संपुष्टात आला. यानंतर त्यांनी 1970 मध्ये त्यांनी पहिल्यांदा अंपायर म्हणून मैदानात उभे राहत कारकीर्दीची नवी सुरुवात केली.

त्यांच्या अंपायरिंगमधील खास वैशिष्ट्य म्हणजे निर्णय घेताना फलंदाजांना शंका असल्यास पुन्हा निर्णय देत असे. अनेक प्रसंगी त्यांचे एल्बीडब्ल्यू निर्णय वादग्रस्त ठरले परंतु त्यांच्या सातत्यामुळे त्यांना आदर मिळाला.त्यांच्या अंपायरिंग कारकिर्दीत अनेक किस्से आजही आठवले जातात.

खेळाडू त्यांच्यासोबत अनेकदा आपुलकीने संवाद सादत. अ‍ॅलन लॅम्बने खिशात जुना मोबाईल घेऊन मैदानात येणे आणि इयान बोथमने तो फोन वाजवून बर्डना चकित करणे ही त्यातील सर्वात गाजलेली घटना होती. फुटबॉलमध्ये करिअर करण्याचे त्यांचे स्वप्न 15 व्या वर्षीच्या शस्त्रक्रियेमुळे पूर्ण झाले नाही.

क्रिकेटसाठीच्या योगदानामुळे त्यांना 1986 मध्ये MBE आणि 2012 मध्ये OBE सन्मान मिळाला. 2009 मध्ये त्यांच्या मूळगावी कांस्य पुतळा उभारण्यात आला. 1998 मध्ये त्यांनी शेवटचा प्रथमश्रेणी सामना अंपायर म्हणून सांभाळला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com