Ayush Mhatre MI vs CSK : पहिल्याच सामन्यात पोरानं कॅप्टनलाच खुश केल! '4,6,6,4...' आयुषची फटकेबाजी पाहून धोनी इम्प्रेस
आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमधील सर्वाधिक वेळा यशस्वी ठरलेले दोन संघ आमनेसामने आले आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज जबरदस्त चुरस लढताना पाहायला मिळत आहे. या दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये आजपर्यंत यशस्वी खेळी दाखवली आहे. त्यामुळे या दोन्ही संघाचा चाहतावर्ग देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. असं असताना आज पलटनसमोर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा युवा खेळाडू आयुष म्हात्रे फलंदाजी करताना पाहायला मिळाला.
ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे चेन्नईच नेतृत्त्व पुन्हा धोनी करत आहे. त्यामुळे ऋतुराजच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून आयुषला फलंदाजी करण्याची संधी चेन्नई दिली होती. याच संधीचं आयुषने सोनं देखील केलं आहे. सामना सुरु होण्याआधी मुंबईने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे चेन्नईचे फलंदाज मैदानात उतरण्यास सज्ज झाले.
यावेळी चेन्नईकडून रचिन रवींद्र अवघ्या 5 धावांवर माघारी परतला. . रचिन रवींद्रने जोरदार स्विंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कॅच घेतला गेला, ज्यामुळे अश्वनी कुमारच्या खात्यात एक विकेट पडली, त्यानंतर चौथ्या ओव्हरला 17 वर्षीय आयुष फलंदाजीसाठी मैदानात उतरला. अश्वनी कुमारच्या पहिल्या बॉलवर आयुषने एक धाव घेत, नंतर स्ट्राईक मिळाल्यावर 4,6,6 अशी फटकेबाजी केली.
त्यानंतर दीपक चहरच्या बॉलवर देखील त्याने चौकार लगावला. त्याचसोबत पुन्हा सातव्या ओव्हरसाठी आलेल्या चहरच्या बॉलवर त्याने चौकार खेचला. 15 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकार मारत 32 धावांची खेळी खेळली तसेच चेन्नईला 52 धावांपर्यंत पोहचवले. त्याच्या या तुफानी खेळीवर चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र खुश झाल्याचा पाहायला मिळाला. त्याच्या फटकेबाजी दरम्यान धोनी इम्प्रेस होऊन स्माईल देत असताना कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने आयुषला 30 लाखांमध्ये आपल्या संघात घेतलं होत. आयुषने 9 फर्स्ट क्लास मॅचमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. एवढचं नव्हे तर त्याने 16 डावांमध्ये आतापर्यंत 2 शतक, 1 अर्धशतक करत 504 धावा केल्या. तसेच 7 लिस्ट ए सामन्यांमध्ये 458 धावा केल्या आहेत. आयुषने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 11.28 च्या सरासरीने 7 विकेट्स रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
मुंबई इंडियन्स प्लेईंग 11
रायन रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार
चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग 11
शेक राशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंग धोनी, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पथिराणा.