MI Vs DC WPL Final 2025 : मुंबई इंडियन्सच्या पोरींची नादखुळा खेळी! दिल्लीला पराभूत करुन दुसऱ्यांदा जिंकली WPL

MI Vs DC WPL Final 2025 : मुंबई इंडियन्सच्या पोरींची नादखुळा खेळी! दिल्लीला पराभूत करुन दुसऱ्यांदा जिंकली WPL

मुंबई इंडियन्सच्या पोरींची नादखुळा खेळी! महिला प्रीमियर लीग 2025 फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून दुसऱ्यांदा जिंकली WPL ट्रॉफी.
Published by :
Prachi Nate
Published on

काल महिला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील फायनल सामना मुंबईतील ब्रबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये पार पडला. यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या पोरींनी आपली कमालीची कामगिरी पाहायला मिळाली आहे. फायनलपर्यंत पोहचणारा मुंबईचा संघ ट्रॉफी उचल्याशिवाय येत नाही. तसेच फायनमध्ये मुंबई इंडियन्सला हरवणं सोपं काम नाही हे मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दाखवून दिल आहे. काल पार पडलेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्यासाठी सांगितले. त्यावेळेस मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स समोर 150 धावांचे आव्हान दिले. दिल्ली कॅपिटल्स मात्र 20 षटकअखेर 141 धावा करत मुंबई इंडियन्सने दिलेले आव्हान पुर्ण करण्यात अपयशी ठरली, आणि मुंबईच्या पोरींनी हा सामना 8 धावांनी जिंकला. यावेळी दिल्ली सलग तिसऱ्यांदा अपयशी ठरली आहे.

मुंबई इंडियन्सची नादखुळा खेळी

यावेळी मुंबईकडून सर्वात पहिली ओपनिंगला यस्तिका भाटीया आणि हेली मॅथ्यूज या दोघी आल्या. यस्तिका मात्र 8 धावा तर हेली मॅथ्यूज अवघ्या 3 धावांवर परत मागे फिरली. त्यानंतर सिव्हर ब्रंटनमे 4 चौकार आणि 66 धावांची खेळी खेळली तर हरमनप्रीत कौरने 66 धावा खेळत असताना 9 चौकार आणि 2 षटकार मारले, असं करत या दोघींनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली आणि मुंबईला सावरल. मुंबई इंडियन्सने 20 षटकअखेर 7 गडी बाद 149 धावांसह ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

दिल्ली कॅपिटल्सची प्रयत्नशील कामगिरी

सर्वात पहिला दिल्लीकडून कर्णधार मेग लेनिंग आणि शेफाली वर्मा मैदानात फलंदाजीसाठी आल्या. मात्र मेग लेनिंग 13 तर शेफाली वर्मा 4 धावांवर माघारी परतल्या. त्यानंतर जेमिमाने चांगली सुरुवात केली होती. मात्र ती 30 धावांवर बाद होऊन परतली. अखेर मारीजेन केपने डाव सांभाळत 40 धावांची खेळी खेळली. शेवटी निकी प्रसादने नाबाद होत, 25 धावांची खेळी खेळली. ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्स आपली प्रयत्नशील कामगिरी बजावत 141 धावा करु शकला. ज्या दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला एकाच हंगामात दोन वेळा हरवलं, त्याच मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये दिल्लीला हरवून पराभवाचा बदला घेतला आणि दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com