Degree In Cricket : आता क्रिकेटमध्ये ही होता येणार पदवीधर! मुंबई विद्यापीठात मिळणार क्रिकेटची पदवी, अभ्यासक्रम काय?

Degree In Cricket : आता क्रिकेटमध्ये ही होता येणार पदवीधर! मुंबई विद्यापीठात मिळणार क्रिकेटची पदवी, अभ्यासक्रम काय?

क्रिकेटमध्ये पदवी घेण्याची संधी! मुंबई विद्यापीठ आणि मुंबई क्रिकेट संघटना एकत्र येऊन एमसीए पदवी अभ्यासक्रम सुरू करणार. क्रिकेटच्या विविध तंत्रांचे शिक्षण मिळणार.
Published by :
Prachi Nate
Published on

क्रिकेटसाठी अनेक क्षेत्रांतून मदत मिळत असते कारण आता क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे. तुम्हाला देखील क्रिकेटचं ज्ञान आहे? क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे? कधी विचार केला आहे का की, क्रिकेटमध्ये तुम्हाला पदवी घेता आली तर? आता ते शक्य आहे, कारण मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मुंबई क्रिकेट संघटना लवकरच एमसीए पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिकेटचा अभ्यास करून पदवीधर होता येणार आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेणारा विद्यार्खी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असावा. त्याने अंडर 19, 23 वर्षाखाली खेळले पाहिजे. हे लक्ष्य ठेवून हा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. क्रिकेटमधल्या वेगवेगळ्या टेक्निक शिकवणारे हे हायब्रीड मॉडेल आहे.

यामध्ये तुम्हाला मैदानाची निगा, तसेच खेळपट्टी तयार करणारे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध बाबींमध्ये या अभ्यासक्रमाद्वारे परिपूर्ण होता येईल. यात क्रिकेटपटूंना मैदानावर शिकण्याचा अनुभव मिळेल तसेच खेळताना त्यांना विविध विषयांत व्यावसायिक कौशल्य मिळवता येईल. त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक पात्रताही मिळेल.

अभ्यासक्रमात नेमकं काय शिकवणार?

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून क्रिकेट नॉलेज सेंटर चालवण्यात येते. क्युरेटर, स्कोरर, अंपायर याचा एक भाग आहे. खेळपट्टी तयार करणारे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध अभ्यासक्रमाचा समावेश आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई युनिव्हर्सिटीसोबत एकत्र येऊन ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम चालवला जाणार आहे. मुंबई विद्यापीठात हायब्रीड प्रोग्रॅम आहेत. चांगल्या नोकरीसाठी ग्रॅज्युएशन महत्त्वाचा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com