क्रिकेट
Nashik Ranji Cricket: रणजी क्रिकेटच्या सामन्यांसाठी नाशिक गोल्फ क्लब सज्ज; 6 वर्षानंतर होणार सामने
रणजी क्रिकेटचे सामने नाशिकमध्ये 6 वर्षानंतर होणार; नाशिक गोल्फ क्लब सज्ज, महाराष्ट्र-बडोदा संघात चार दिवसीय सामना 23 जानेवारीपासून.
रणजी क्रिकेट सामाना नाशिकच्या गोल्फ क्लब सज्ज झाले आहे. तब्बल सहा वर्षांनंतर रणजी कंरडकचे हे सामने नाशिकमध्ये होणार आहेत. बीसीसीआय आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि बडोदा संघात रंगणार हा चार दिवसीय सामना आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे ( गोल्फ क्लब ) मैदानामध्ये सामना रंगणार असून या मैदानात दहा हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या क्रिकेटचा सामना 23 जानेवारीपासून नाशिकमध्ये रंगणार आहे. नाशिककर आणि क्रिकेटप्रेमींमध्ये क्रिकेटच्या सामन्यांची उत्सुकता पाहायला मिळत आहेत.