Player Of The Series Jasprit Bumrah: ट्रॉफी नाही! पण टीम इंडियाच्या पठ्ठ्याने पटकवला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब
सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 ची मालिकाची समाप्ती झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेवर 3-1 विजया मिळवला आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024साठी मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात भारतीय संघाला नक्कीच यश आले होते, पण चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळ दिसून आला. या मालिकेत भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने नक्कीच जीवतोड मेहनत घेतली आहे.
मात्र, शेवटी भारतीय फलंदाजीबरोबरच गोलंदाजीनेही निराशा केली. शेवटच्या कसोटीसाठी कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहलाही दुखापत झाली. अशा स्थितीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही.
सिडनी कसोटी हरल्यानंतर बुमराहने भारतीय संघाचा बचाव केलाया सामन्यात जसप्रीत बुमराह हा एकमेव खेळाडू आहे जो योद्धासारखा लढत राहिला आणि सामनावीर ठरला. बुमराहने या मालिकेत वादळी कामगिरी करत 32 विकेट घेतल्या, या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
याचपार्श्वभूमीवर बुमराह म्हणाला की, 'थोडी निराशा आहे पण, तुम्ही तुमच्या शरीराशी लढू शकत नाही. काहीवेळा तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यावी लागते. मला मालिकेतील सर्वोत्तम विकेटवर अधिक गोलंदाजी करायची होती पण ते पहिल्या डावात काही समस्या निर्माण झाल्या नाहीत'.
जस्प्रित बुम्हराहाने रचला इतिहास ठरला बेस्ट प्लेअर!
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील कसोटी सामन्यात बुमराहने विकेट्सचं द्विशतक पूर्ण केल आहे. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आऊट करून ही खास कामगिरी केली. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला जे जमले नाही ते एका भारतीय गोलंदाजाने केल आहे. कसोटीत 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे. यावेळचा ऑस्ट्रेलिया दौरा जसप्रीत बुमराहसाठी सर्वोत्तम ठरला आहे. मेलबर्न स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या दिवशी बुमराहसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी लोटांगण घातलं.