R Ashwin Retirement: मोठी बातमी! रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. गाबा कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. अश्विनने घेतलेल्या या निर्णयामुळे टीम इंडियाला आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका लागला आहे.
अश्विनने गाबा कसोटीत पावसामुळे सामना थांबला होता तेव्हा विराट कोहलीबरोबर बोलताना अश्विन खूप भावुक झालेला दिसला. विराट त्याला मिठी मारत त्याचं सांत्वन करताना दिसला. ज्याचा व्हीडिओही व्हायरल होताच त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती आणि सामना संपताच त्याने निवृत्ती जाहीर केली.
अश्विन निवृत्ती जाहीर करताना नेमकं काय म्हणाला?
“आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल. मी क्लब-क्रिकेट खेळत राहिन. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस असेल, मी रोहित आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांबरोबर खूप आठवणी निर्माण केल्या आहेत, असे अश्विनने पत्रकार परिषदेत सांगितले.
रविचंद्रन अश्विन हा भारतीय कसोटी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फिरकीपटू ठरला आहे. अश्विनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 38 वर्षीय अश्विन टीम इंडियाकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर एकूण 537 कसोटी विकेट्स आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं टीम इंडियासाठी 37 वेळा एका डावात सर्वाधिक 5 बळी घेतले. तसेच, त्यानं सर्वाधिक प्लेयर ऑफ द सीरीज अवॉर्ड (11 वेळा) आपल्या नावे केले आहेत. यामध्ये अश्विननं मुरलीधरनची बरोबरी केली आहे. फिरकीपटू म्हणून त्याचा गोलंदाजीचा स्ट्राइक रेट 50.7 (200+ विकेट) आहे, जो आजवरचा सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे.