IPL News : रोहित-विराटनंतर आणखी एक धक्का! CSK मधील स्टार खेळाडूने केला IPL ला गुडबाय

IPL News : रोहित-विराटनंतर आणखी एक धक्का! CSK मधील स्टार खेळाडूने केला IPL ला गुडबाय

क्रिकेटविश्वात सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगली असतानाच, टीम इंडियाचा आणखी एक मोठा खेळाडू आयपीएलमधून निवृत्त झाला आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

क्रिकेटविश्वात सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगली असतानाच, टीम इंडियाचा आणखी एक मोठा खेळाडू आयपीएलमधून निवृत्त झाला आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने सोशल मीडियावर पोस्ट करत IPL करिअरला अलविदा म्हटलं. या निर्णयामुळे अनेक क्रिकेटप्रेमी आश्चर्यचकित झाले आहेत.

अश्विनने एक्सवर लिहिलं की, “हा माझ्या आयुष्यातील खास दिवस आहे. प्रत्येक शेवट हा एका नवीन सुरुवातीची नांदी असते. माझा IPL प्रवास इथे थांबतोय, पण जगभरातील विविध लीगमध्ये खेळण्याचा प्रवास आता सुरू होतोय.” त्याने या पोस्टमध्ये IPL, BCCI आणि सर्व फ्रँचायझींना आभार मानले.

अश्विनच्या निवृत्तीमागचं प्रमुख कारण म्हणजे जागतिक T20 लीगमध्ये खेळण्याची इच्छा. BCCI च्या नियमानुसार, IPL खेळताना इतर देशांच्या लीगमध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे अश्विनने IPL करिअर संपवून परदेशी लीग खेळण्याचा मार्ग निवडला.

रविचंद्रन अश्विनचा IPL प्रवास 2009 साली सुरू झाला. त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण करताना सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर रायजिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे प्रतिनिधित्व केलं. अखेरीस IPL 2025 मध्ये तो पुन्हा CSK संघात दिसला आणि इथूनच त्याने निवृत्ती जाहीर केली.

16 वर्षांच्या IPL कारकिर्दीत अश्विनने एकूण 221 सामने खेळले, ज्यात त्याने 187 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने फलंदाजीतही योगदान देत 833 धावा आणि एक अर्धशतक नोंदवलं. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो IPL इतिहासातील यशस्वी फिरकीपटूंपैकी एक ठरला. अश्विनचा अचानक घेतलेला हा निर्णय जरी चाहत्यांना धक्का देणारा असला, तरी त्याच्या क्रिकेट प्रवासात आता एका नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com