RCB Vs PBKS IPL 2025 : अरे देवा! RCB सोबत मोठा गेम झाला, फायनलपूर्वी हुकमी एक्क्याच्या खेळण्यावर BCCIची कारवाई?

RCB Vs PBKS IPL 2025 : अरे देवा! RCB सोबत मोठा गेम झाला, फायनलपूर्वी हुकमी एक्क्याच्या खेळण्यावर BCCIची कारवाई?

फायनलपुर्वी आरसीबी फॅन्ससाठी मोठा धक्का बसला आहे. आरसीबी संघातील स्टार फलंदाज फिल सॉल्ट वैयक्तिक कारणामुळे अंतिम सामन्याला गैरहजर राहण्याची शक्यता आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

आज आयपीएल 2025 स्पर्धेचा महाअंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर या सामन्यासाठी पंजाब आणि बंगळुरु या दोन्ही संघाच्या चाहत्यांची धाकधुक वाढलेली आहे. कारण, दोन्ही संघांसाठी आयपीएल 2025 चा विजय हा पहिला विजय असणार आहे. त्यामुळे आज कोणाचं पारड कोणावर भारी पडणार हे पाहण फार महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र फायनलपुर्वीच आरसीबी फॅन्ससाठी मोठा धक्का बसला आहे. आरसीबी संघातील स्टार फलंदाज फिल सॉल्ट वैयक्तिक कारणामुळे अंतिम सामन्याला गैरहजर राहण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सॉल्टची पत्नी गर्भवती आहे आणि लवकरच तिची डिलिव्हरी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यानिमित्ताने तो त्याच्या मायदेशी परतण्याच्या शक्यता आहेत. याबाबत आरसीबीने कोणतीही माहिती अद्याप दिली नाही. सॉल्टने अनेक सामन्यांत RCB ला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. तर दुसरीकडे आरसीबीचा स्फोटक फलंदाज टिम डेव्हिड तंदुरुस्त नाही.

दरम्यान आयपीएल 2025 च्या स्पर्धेत 12 सामन्यांत 175.90 च्या स्ट्राइक रेटने आणि 35.18 च्या सरासरीने 387 धावा केल्या असून त्याने 21 शतक केले आहेत. मात्र जर आज महत्त्वाच्या सामन्यादरम्यान सॉल्ट गैरहजर राहिला तर ओपनिंगसाठी विराट कोहलीबरोबर मयांक अग्रवाल मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे आरसीबीला मोठा धक्का बसू शकतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com