Rishabh pant video : ऋषभ पंतची करामत बघून हसू आवरेना! कुलदीप यादवला धक्का देत केलं आऊट, पुढे काय घडलं?
काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा अनपेक्षित पराभव केला आहे. लखनऊने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला 210 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान दिल्लीने एका विकेटने स्विकारत विजय मिळवला आहे. तसेच दिल्लीने 19.3 ओव्हरमध्ये 211 धावा केल्या.
लखनऊ सुपर जायंट संघ सामना हरला जरी असला तरी आपल्या मित्राला पाहुन रिषभला त्याचा चंचलपणा आवरला नाही. सामना सुरु असताना रिषभ पंत आणि कुलदीप यादव यांची मैत्री तर संपुर्ण देशाला माहित आहे. अस असताना काल झालेल्या सामन्यात रिषभ आणि कुलदीपची वेगळीच मज्जा पाहायला मिळाली. 18 वी ओव्हर सुरु असताना कुलदीप यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्यावेळी लखनऊकडून रवि बिश्नोई हा गोलंदाजी करत होता.
अशातच या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर कुलदीप बाद झाला, कारण कुलदीपने मारलेला चेंडू हा लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या हातात गेला. मात्र, चेंडूला फटका मारत असताना कुलदीपचा तोल जात असल्याच पाहायला मिळालं यावेळी त्याने स्वतःला सावरलं. त्यावेळी रिषभने त्याला मागून ढक्कल आणि जसा त्याचा तोल गेला आणि तो पडला त्यावेळेस रिषभने बेल्स उडवून कुलदीपला चिडवलं. या व्हिडिओमध्ये दोघेही अगदी लगान मुलांसारखे वाटत आहेत. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.