Rohit Sharma : भारतात परतताच हिटमॅनचा पारा चडला! विमान तळावरील व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma : भारतात परतताच हिटमॅनचा पारा चडला! विमान तळावरील व्हिडिओ व्हायरल

रोहित शर्मा मालदीवहून परतल्यावर मुंबई विमानतळावर कॅमेरामॅन्सवर भडकला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
Published by :
Prachi Nate
Published on

रोहित शर्मा चॅंपियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत मालदीवला गेला होता. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवून 17 मार्चला भारतात परतला आहे. मात्र भारतात परतताच हिटमॅन कॅमेरामॅन्सवर तापला आहे, ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मंबई विमानतळावर आल्यावर रोहित शर्माने त्याच्या कुटुंबाचे फोटो काढणाऱ्यांची फिल्डिंग लावली आहे. रोहित शर्मा कॅमेरामॅन्सवर भडकला त्यामगचे कारण म्हणजे, मुंबई विमानतळावर असलेले काही कॅमेरामॅन्स रोहितला पाहताच त्याच्या दिशेने धावून गेले आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो काढू लागले. त्यानंतर सगळे त्याच्या मुलीच्या दिशेने जाऊ लागले ज्यामुळे ती थोडी घाबरली त्यामुळे रोहित शर्मा कॅमेरामॅन्सवर भडकला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित कॅमेरामॅन्सवर चिडत आपल्या मुलीला म्हणजेच समायराला गाडीच्या दिशेने घेऊन जाताना दिसत आहे. मुलीला गाडीत बसवल्यानंतर त्याच्याजवळ त्याचे फॅन्स फोटो काढण्यासाठी आले. रोहितने आपल्या कुटुंबाला गाडीत बसवल्यानंतर फोटो काढणाऱ्या फॅन्सकडे गेला आणि तसेच कॅमेरामॅन्सकडे जाऊन त्यांच्या कॅमेरामध्ये पाहत पोज देत हसला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com