Rohit Sharma : टेस्टमधील निवृत्तीवर रोहित शर्मा काय म्हणाला?

Rohit Sharma : टेस्टमधील निवृत्तीवर रोहित शर्मा काय म्हणाला?

रोहित शर्मा म्हणतो की, सिडनी कसोटीमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला पण निवृत्ती नाही. कठोर मेहनत करून परत येणार.
Published by :
shweta walge
Published on

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या फ्लॉप प्रदर्शनामुळे सध्या टीम इंडियात अंतर्गत कलह सुरु आहेत. हेड कोच गौतम गंभीर यांना हटवणार, रोहित शर्माची कॅप्टन म्हणून ही शेवटची सीरीज आहे, अशा बातम्या सुरु होत्या. या सगळ्या चर्चांणवर भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसच सिडनी टेस्टमध्ये त्यांचा अनुपस्थितीचा कारण देखील सांगितलं आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील दुसऱ्या दिवशीच्या लंच इंटरव्हल दरम्यान स्टार स्पोर्ट्सशी ते बोलत होते.

रोहित म्हणाला की, “मी कठोर मेहनत करत होतो. पण चांगलं प्रदर्शन होत नव्हतं. म्हणून सिडनी टेस्ट मॅचपासून लांब रहाणं आवश्यक होतं” ‘मी क्रिकेट सोडून कुठे जात नाहीय’, हे रोहित शर्माने आज स्पष्ट केलं. “मी लवकर रिटायर होणार नाही. माझ्या धावा होत नव्हत्या म्हणून मी सिडनी कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. मी कठोर मेहनत करुन कमबॅक करीन. आजा धावा होत नाहीयत, पण म्हणून पाच महिन्यानंतर सुद्धा धावा होणार नाहीत, असं नाहीय” हे रोहित शर्माने स्पष्ट केलं.

टेस्टमधील निवृत्तीवर रोहित शर्मा म्हणाला की, “मी सिडनी कसोटीतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय. पण मी कुठे जात नाहीय. हा रिटायरमेंट किंवा टेस्ट फॉर्मेटपासून दूर जाण्याचा निर्णय नाहीय. माइक, पेन किंवा लॅपटॉपवाला कोणीही माणूस काहीही लिहितो, बोलतो त्याने फरक पडत नाही. ते आमच्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाहीत. मी सिडनीला आल्यानंतर बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. हा, धावा होत नाहीयत. पण या गोष्टीची गॅरेंटी नाही की, दोन महिने किंवा सहा महिन्यानंतर तुमच्या धावा होणार नाहीत. मी परिपक्व आहे, मी काय करतोय हे मला माहितीय” असं रोहित शर्मा म्हणाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com