Shreyas Iyer Captain: श्रेयश अय्यर पंजाबचा 17वा कर्णधार, बिग बॉसच्या स्टेजवर मोठी घोषणा

Shreyas Iyer Captain: श्रेयश अय्यर पंजाबचा 17वा कर्णधार, बिग बॉसच्या स्टेजवर मोठी घोषणा

आयपीएल 2025साठी पंजाब किंग्जचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यर! बिग बॉसमध्ये अभिनेत्री प्रिती झिंटा आणि सलमान खानच्या उपस्थितीत केली घोषणा.
Published by :
Prachi Nate
Published on

आयपीएल 2025च्या लिलावात श्रेयस अय्यरने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते. त्याला पंजाब किंग्सने 26.75 कोटीला संघात सामिल करून घेतले. याचसोबत आता श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जच्या कॅप्टन्सीवर आपलं नाव जोडल आहे. पंजाब किंग्जने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

2024 मध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ स्पर्धेची ट्रॉफीवर आपल्या संघाचं नाव कोरलं होत. एका वेगळ्या अंदाजासह त्याने आपल्या कर्णधार पदाची घोषणा केली.

‘बिग बॉस’ या रियालिटी शोमध्ये अभिनेत्री प्रिती झिंटाच्या संघामधील काही खेळाडू उपस्थित होते ज्यामध्ये श्रेयस अय्यर, फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि शशांक सिंह हे दोघेही उपस्थित होते. यावेळी शोमध्ये नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं गेल. रविवारी 12 जानेवारी रोजी बिग बॉसचा वीकेंड वार होता या स्पेशल एपिसोडमधून सलमान खानने पंजाब किंग्जच्या कर्णधारपदी श्रेयसचं नाव जाहीर केलं.

पंजाब किंग्जचा संघ

फलंदाज

श्रेयस अय्यर, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, नेहाल वढेरा, विष्णु विनोद, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश, जोश इंग्लिश (ऑस्ट्रेलिया), प्रियांश आर्या.

गोलंदाज

युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, हरुप्रीत ब्रार, कुलदीप सेन, झावियर बार्नेट (ऑस्ट्रेलिया), लोकी फर्ग्युसन (न्यूझीलंड).

ऑल राउंडर

मार्कस स्टॉयनीस (ऑस्ट्रेलिया), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), सुयश शेडगे, मार्को जेन्सेन (द. आफ्रिका), ऍरॉन हार्डी (ऑस्ट्रेलिया), अझमतुल्लाह ओमरझाई (अफगाणिस्तान ), प्रवीण दुबे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com