स्मृती मंधानाने रचला इतिहास! भारतीय फलंदाजाकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

स्मृती मंधानाने रचला इतिहास! भारतीय फलंदाजाकडून वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

स्मृती मंधानाने विंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 62 धावांची खेळी करत न्यूझीलंडच्या सुझी बेट्सच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. ती सर्वाधिक टी20 अर्धशतक करणारी महिला क्रिकेटर बनली आहे.
Published by :
shweta walge
Published on

भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी खेळाडू स्मृती मंधानाने इतिहास रचला आहे. तिने विंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात 62 धावांची खेळी केली. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळलेल्या या सामन्यात स्मृतीने 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं, ज्यात 8 चौकारांचा समावेश होता. हे तिचं सलग दुसरं आणि एकूण 29 वं टी20i अर्धशतक आहे. यासह स्मृतीने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली आहे, आणि ती सर्वाधिक टी20 अर्धशतक करणारी महिला क्रिकेटर बनली आहे.

सुझी बेट्स : 29

स्मृती मंधाना : 29

बेथ मूनी : 25

स्टॅफनी टेलर : 22

सोफी डीव्हाईन : 22

कॅप्टन स्मृती मंधाना हिच्या 62 धावांच्या खेळीनंतरही टीम इंडिया विंडिजविरुद्ध पराभूत झाली. भारताने विंडिजला 160 धावांचे लक्ष्य दिले होते, पण विंडिजने फक्त 1 विकेट गमावून ते सहज पूर्ण केले. या विजयासह विंडिजने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com