Steve Smith Retirement: स्टीव्ह स्मिथची निवृत्ती जाहीर

Steve Smith Retirement: स्टीव्ह स्मिथची निवृत्ती जाहीर

भारताविरुद्धच्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथची निवृत्तीची घोषणा: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण टी-20 क्रिकेटमध्ये 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा.
Published by :
Team Lokshahi
Published on

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा उंपात्य फेरीचा सामना काल ४ मार्च रोजी झाला. दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत झाली. भारताने ४ गडी राखून ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने एक मोठा निर्णय घेतला आहे. स्मिथने निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होता. स्मिथच्या नेतृत्वाखालील संघ फक्त उंपात्य फेरीपर्यंत पोहचू शकला. अशी परिस्थिती असताना स्मिथने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे.

स्टीव्ह स्मिथ याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. त्याची इच्छा आहे की, तो 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी खेळणार आहे. डावखुरा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने ऑस्ट्रेलियासाठी 169 एकदिवसीय सामने खेळले होते. त्या सामान्यांमध्ये स्मिथने 5757 धावा काढल्या आहेत. ज्यामध्ये 12 शतके आणि 34 अर्धशतके असून, तो 20 वेळा नाबाद परतला. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 517 चौकार आणि 57 षटकार मारले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com