Suryakumar Yadav Lead MI : सुर्यादादा करणार MI चे नेतृत्त्व, तर बुमराहची सुरवातीच्या सामान्यात गैरहजेरी?
देशभरात आता क्रिकेट प्रेमींची आयपीएल 2025 ची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. यावर्षीचे सामने 22 मार्च 2025 पासून सुरु होणार असून या वर्षीचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये ईडन गार्डनवर होणार आहे. तसेच यावेळचा अंतिम सामना 25 मे रोजी ईडन गार्डनवर खेळला जाणार असल्याचे समोर आले आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये लढवला जाणार आहे. आयपीएल दरम्यान बहू चर्चेत असलेली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स, या टीमबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंबई इंडियन्स या टीमच्या पहिल्या सामन्या दरम्यान हार्दिक पांड्या सामना खेळू शकणार नाही त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघाचे नेतृत्त्व कोण करणार असा प्रश्न पडला होता. असं असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सुर्यकुमार यादव कर्णधार तर बुमराह सुरवातीच्या सामान्यासाठी मुकावे लागणार
हार्दिक पांड्याने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. हार्दिकने केलेल्या या घोषणेमुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना जोरदार झटका लागला आहे. सूर्यकुमार यादव मुंबईची धुरा सांभाळणार असून आयपीएलमध्ये कर्णधारपदाची त्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच घोषणे दरम्यान हार्दिक पांड्या म्हणाला की, "माझ्यासोबत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या रूपाने तीन कर्णधार खेळत आहेत, यामुळे मी खरंच खूप भाग्यवान आहे. तिघेही नेहमीच माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे असतात. जसप्रीत बुमराह सध्या दुखापतग्रस्त आहे.तो पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल". त्यामुळे आता जसप्रीत बुमराह सुरूवातीच्या काही सामन्याला उपलब्ध नसेल अशी माहिती समोर आली आहे.
हार्दिक पांड्यावर पहिलाच सामना खेळण्यावर बंदी
आयपीएल दरम्यान दुसऱ्या दिवशी होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना चेन्नई येथे एल क्लासिकोत होणार आहे. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यातून बाद करण्यात आलं आहे. आयपीएल 2024 मध्ये लखनऊ विरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांचे ओव्हर्स वेळेतपूर्ण करू शकली नव्हती, तीन ओव्हर-रेट गुन्ह्यांसाठी संपुर्ण टीमसह हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.