Champions Trophy 2025: टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईकडे रवाना! विराट, रोहित अन् हार्दिकसह इतर खेळाडूंची एअरपोर्टवरील झलक
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया 15 फेब्रुवारीला दुबईकडे रवाना झाली झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तानच्या यजमानपदाखाली सुरू होणार असून 8 पैकी 7 संघ पाकिस्तानला पोहोचत आहेत जिथे ते प्रत्येक संघ या स्पर्धेत आपले सामने खेळेल. ए ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या तीन संघाचा समावेश असणार आहे. यादरम्यान टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने खेळणार असल्याचं समोर आलं आहे.
ज्यामध्ये टीम इंडियाचा पहिला सामना हा बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारीला होणार आहे, तसेच 23फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि 2 मार्चला तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिका सामन्यात इंग्लंडला चारीमुंड्या चीत केल. त्यामुळे आता टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कंबर कसून तयार असल्याच पाहायला मिळालं.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचे कोच, खेळाडूआणि स्टाफ निघाला आहे. यादरम्यान टीम इंडियाचा एअरपोर्टवरील व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर तसेच गोलंदाजीचे कोच मोर्ने मॉर्केल त्याचसोबत विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, शुभमन गिल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग अशी टीम इंडियाची मंडळी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला आहे.