Asia Cup 2025 Final : आता विजय आपलाच! 28 तारीख भारतासाठी लकी का?
क्रिकेटप्रेमींसाठी भारत आणि पाकिस्तान सामना हा केवळ सामना नसून ती दोन चाहत्यांमधील उत्सुकता असते. टीम इंडियाने आतापर्यंत 8 वेळा आशिया कपावर नाव कोरले आहे. तर पाकिस्तानला दोनदाच विजय मिळवता आला. दरम्यान 28 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात विजेतेपदाची निर्णायक लढत रंगणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत.
ग्रुप स्टेज आणि सुपर फोर या दोन्ही वेळा टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यामुळे टीम इंडियासाठी ही हॅट्रिक संधी असून पाकिस्तानसाठी ही महत्त्वाची संधी आहे. दरम्यान असं म्हणणं आहे की, 28 तारखेचं टीम इंडियासाठी विशेष महत्त्व आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 28 तारखेला होणाऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानवर मात करण सहज शक्य होत अशी मान्यता आहे.
भारताने आतापर्यंत 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 मध्ये जेतेपद जिंकले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापूर्वी झालेल्या दोन अंतिम सामन्यांत भारताने दणदणीत विजय मिळवून पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला टी-20 अंतिम सामना 28 डिसेंबर 2012 रोजी झाला होता.
यावेळी भारताने शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला होता. तर 28 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या आशिया कपच्या टी-20 सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4 गडी गमावत विजय मिळवला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडिया नेहमीच विजयी झाली आहे, त्यामुळे 28 तारीख भारतासाठी शुभ मानली जाते.