ICC Women World Cup Schedule : Operation Sindoor नंतर भारत पाकिस्तान महिला संघ येणार आमनेसामने; वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा रंगतदार सामना रंगणार आहे. वूमन्स वर्ल्ड कप ही स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरु होणार असुन 2 नोव्हेंबरला अंतिम सामना पार पडणार आहे. तर 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी सेमी फायनल सामने होणार आहेत.या स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका या दोघांकडे असून संयुक्त यजमानपदासह वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत.
विश्वचषकाचा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका असा खेळला जाणार आहे. एकूण 5 स्टेडियममध्ये सामने होणार असून बंगळुरु, इंदूर, वायझॅग, कोलंबो आणि गुवाहाटी इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत एकूण 28 सामने होणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 7-7 सामने खेळणार असून त्यानंतर सेमी फायनलमधील 2 सामने खेळवण्यात येतील. 2 नोव्हेंबर रोजी अंतिम विजेतेपदासाठी लढत होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
पहलगाम च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणतेही सामने होणार नाहीत असे म्हटले जात होते मात्र आता त्या गोष्टीला पूर्णविराम लावला गेला आहे. बीसीसीआय सचिवांनी सांगितल्याप्रमाणे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारताला यजमानपद दिले असल्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहेत.टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटचा महामुकाबला होणार आहे.मात्र बहुतेक सामने भारतात होणार असल्यामुळे भारतीय प्रेक्षकांना ही क्रिकेट स्पर्धा आणि आवडत्या खेळाडूंना थेट पाहण्याची संधी मिळणार आहे.
वेळापत्रक
30 सप्टेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका - बंगळुरू
5 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान , कोलंबो
9 ऑक्टोबर: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - विशाखापट्टनम्
12 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - विशाखापट्टनम्
19 ऑक्टोबर: भारत विरुद्ध इंग्लंड - इंदूर
23 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड - गुवाहाटी 26 ऑक्टोबर: भारत विरुद्ध बांगलादेश - बंगळुरू
29 ऑक्टोबर: पहिला उपांत्य सामना
30 ऑक्टोबर: दुसरा उपांत्य सामना - बंगळुरू
2 नोव्हेंबर: अंतिम सामना - (जर पाकिस्तान संघ'जिंकला तर अंतिम सामना कोलंबोमध्ये होईल, अन्यथा बेंगळुरू अंतिम सामन्याचे आयोजन केले जाईल )