क्रिकेट
MI Vs PBKS IPL 2025 : मुंबई इंडियन्ससह पंजाब किंग्जसाठी 'करो या मरो'ची लढाई! कोणाचं पारडं पडणार भारी?
आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार असून अंतिम फेरीचा दुसरा संघ निश्चित होणार आहे.
30 मे ला मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2025 चा एलिमिनेटर सामना पार पडला. यादरम्यान मुंबईच्या शिलेदारांनी गुजरातचा दारुण पराभव केला, आणि थेट क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली आहे. आयपीएलचा दुसरा अंतिम फेरीचा संघ आज निश्चित होणार आहे. आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्वॉलिफायर 2 फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु लढणार आहे. त्यामुळे हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात दोन्ही संघासाठी करो या मरोची लढाई आहे.