ENG vs IND, Yashasvi Jaiswal :  इंग्लंड विरुद्ध जैस्वालची बॅट चमकली ! अन् पहिला दिवस 'यशस्वी' रित्या टीम इंडियाच्या नावे; Test Match

ENG vs IND, Yashasvi Jaiswal : इंग्लंड विरुद्ध जैस्वालची बॅट चमकली ! अन् पहिला दिवस 'यशस्वी' रित्या टीम इंडियाच्या नावे; Test Match

हेडिंग्लेमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून, इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी चमकताना पाहायला मिळाली.
Published by :
Prachi Nate
Published on

शुक्रवारपासून हेडिंग्लेमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी चमकताना पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या फंलदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीसह कसोटी मालिकेचा पहिला दिवस भारताच्या नावे केला आहे.

लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने 3 विकेट गमावून 359 धावा करत उत्कृष्ट फलंदाजी केली, आणि मोठी धावसंख्या उभारली. टीम इंडियाने लीड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी करत मोठी धावसंख्या उभारली. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 85 षटकांत 3 बाद 359 धावा केल्या आहेत.

यादरम्यान सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. या सामन्याला कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखाली केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल पहिल्याच दिवशी प्रभावशाली ठरले आहेत. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने 91 धावांची भागीदारी करत 39 वर्षे जूना विक्रमही मोडला.

त्याचसोबत कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यातही शतकी भागीदारी झाली. तर दुसरीकडे यशस्वी जैस्वाल या सामन्यात प्रभावी ठरला आहे. त्याने 16 चौकार आणि 1 षटकार मारत 144 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. या कसोटी सामन्यातील हे त्याचे 5 वे शतक असून इंग्लंडमध्ये पहिलेच शतक आहे .

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com