Champions Trophy Team IND: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताचे 'हे' तगडे खेळाडू करणार कमबॅक

Champions Trophy Team IND: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारताचे 'हे' तगडे खेळाडू करणार कमबॅक

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंग यांचा कमबॅक, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिसणार तगडे खेळाडू.
Published by :
Prachi Nate
Published on

सिडनीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 ची मालिकाची समाप्ती झाली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या मालिकेवर 3-1 विजया मिळवत भारताचा 6 विकेट्सनी पराभव करत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024साठी मालिकेतील पहिला सामना जिंकण्यात भारतीय संघाला नक्कीच यश आले होते, पण चार सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दमदार खेळ दिसून आला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली असून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या शर्यतीतूनही बाहेर झाली आहे. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली.

भारतीय संघातील 3 स्टार खेळाडूंचा कमबॅक

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 12 जानेवारीपर्यंत सर्व संघांना आपल्या संघाची घोषणा करावी लागणार आहे. त्यामुळे निवडकर्ते मजबूत आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अशातच आता इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. यावेळी 5 टी20 आणि 3 वनडे अशी सामन्यांची मालिका दोन्ही संघामध्ये रंगणार आहे. दरम्यान या मालिकेमध्ये भारतीय संघातील हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंग या 3 स्टार खेळाडू कमबॅक करणार आहेत.

हार्दिक आणि अर्शदीपसह श्रेयस अय्यरला संघात संधी

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली तसेच अय्यरने देखील त्याची वादळी फलंदाजी दाखवली पाँडेचेरीविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रेयसने 137 धावांची खेळी केली होती. यासह कर्नाटकविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ११४ धावा केल्या होत्या. ज्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. तसेच वर्ल्डकप २०२३ स्पर्धे दरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. ज्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पंड्या भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र आता त्याची कामगिरी पाहता त्याला पुन्हा एकदा वनडे संघात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे हार्दिक आणि अर्शदीपसह श्रेयस अय्यरला देखील संघात कमबॅक करण्याची संधी मिळू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com