MI vs CSK IPL 2025 : वसईचा पठ्ठ्या राडा घालणार! मुंबई इंडियन्सविरुद्ध घरचं मैदान गाजवणार

MI vs CSK IPL 2025 : वसईचा पठ्ठ्या राडा घालणार! मुंबई इंडियन्सविरुद्ध घरचं मैदान गाजवणार

वसईचा पठ्ठ्या आयुष म्हात्रे आजच्या MI vs CSK सामन्यात पदार्पण करणार, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार हाय वेटेज सामना.
Published by :
Prachi Nate
Published on

आयपीएल मधील सर्वात हाय वेटेज सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएलमधील यशस्वी प्रतिस्पर्धी संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हे आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघानी आयपीएलच्या आजवरच्या कारकिर्दीत 5-5 ट्रॉफी जिंकल्या आहेत.

मात्र, 2025च्या आयपीएल स्पर्धेदरम्यान आतापर्यंत झालेल्या सामन्यांनमध्ये दोन्ही संघाची कामगिरी तितकीशी चांगली पाहायला मिळाली नाही. मागील दोन सामन्यांत विजय मिळवून मुंबईच्या पलटणने आपली दोर सांभाळली आहे. तर दुसरीकडे चेन्नईने देखील दोन सामने जिंकून 10 व्या क्रमांकावर ठाण मांडला आहे. असं असताना आज या दोन्ही संघांपैकी कोण बाजी मारणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

तर दुसरीकडे मुंबईचं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा युवा आयुष म्हात्रे पलटणविरुद्ध आयपीएल पदार्पण करण्याची शक्यता आहे. गेल्या काही सामन्यादरम्यान चेन्नईचं नेतृत्त्व करणारा ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे चेन्नईच नेतृत्त्व पुन्हा धोनी करत आहे. मात्र चेन्नच्या फलंदाजांमुळे येणार अपयश त्यांच्या विजयामध्ये अडथळा आणत आहे.

असं असताना आता वसईतील 17 वर्षाचा आयुष म्हात्रेला आजच्या सामन्यात मुंबईविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकते. ऋतुराजच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून आयुषला 30 लाखांमध्ये चेन्नईने आपल्या संघात घेतलं. आयुषने 9 फर्स्ट क्लास मॅचमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. एवढचं नव्हे तर त्याने 16 डावांमध्ये आतापर्यंत 2 शतक, 1 अर्धशतक करत 504 धावा केल्या. तसेच 7 लिस्ट ए सामन्यांमध्ये 458 धावा केल्या आहेत. आयुषने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 11.28 च्या सरासरीने 7 विकेट्स रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com