Mohammad Rizwan-Harshit Rana : IND vs PAK सामन्यादरम्यान धक्काबुक्की! हर्षित राणा-रिझवान भिडले, नेमक काय झाल?

Mohammad Rizwan-Harshit Rana : IND vs PAK सामन्यादरम्यान धक्काबुक्की! हर्षित राणा-रिझवान भिडले, नेमक काय झाल?

IND vs PAK सामन्यात हर्षित राणा आणि मोहम्मद रिझवान यांच्यातील धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल, नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.
Published by :
Prachi Nate
Published on

काल दुबईच्या मैदानात दोन कट्टर प्रतिस्पर्धी दुबईच्या मैदानावर आमने-सामने आले होते. या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामान्यासाठी संपुर्ण देशभरात क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली होती. या हायहोल्टेज लढतीला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली त्यामुळे टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी घेऊन पाकिस्तानने भारताला 242 धावांचे आव्हान दिले होते. यावेळी सुरुवातीला पाकिस्तानने 8 ओव्हरमध्ये चौकार-षटकार मारत 37 धावा केल्या होत्या. यानंतर बाबर आझम आणि इमाम उल हक हे दोघे मैदानात आले आणि बाबर आझमचा बदला घेत हार्दिक पांड्याने त्याची विकेट घेतली. यानंतर शकील आणि रिझवान हे दोघे मैदानात आले आणि तेव्हाच हर्षित राणा आणि रिझवान हे आमने सामने भिडले.

नेमक काय झालं?

शकील आणि रिझवानची जोडी मैदानात आली पण त्यांना भारताच्या गोलंदाजांनी फार धावा करण्याची संधी दिली नाही. 21व्या ओव्हरला टीम इंडियाकडून हर्षित राणा गोलंदाजीसाठी समोर आला. हर्षितने रिझवानविरूद्ध चांगली गोलंदाजी केली. त्याने अवघ्या 3 धावा दिल्या. रिझवानने शेवटच्या ओव्हरवर फटका मारला आणि धाव घेण्यासाठी गेला. त्यावेळी हर्षित राणाने गोलंदाजी करुन पुढे पिचवर जाऊन थांबला.

त्यावेळी रिझवानने चेंडूला फटका मारल्यानंतर तो चेंडूकडे पाहत होता, आणि त्यावेळेस जाता जाता त्याने हर्षितला धक्का दिला. धक्का लागल्यामुळे हर्षितही चांगलाच भडकला होता. चिडून त्याने रिझवानला वळून "काय" असं म्हटल्याचं व्हिडियोमध्ये पाहायला मिळाल आहे. त्यावेळी रिझवान काहीच न बोलता त्याची धाव पूर्ण करण्याच्या मागे लागला. मात्र हा सगळा प्रकार होत असताना गौतम गंभीर देखील यावर ड्रेसिंगरुम मधून गंभीर हाव भावांसह पाहत होता.

मोहम्मद रिझवान आणि सौद शकिल यांनी 100 अधिक धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सौद शकीलने आपले अर्धशतक केले मात्र अक्षर पटेलने रिझवानला क्लीन बोल्ड केल. यानंतर हार्दिकच्या गोलंदाजीवर सौद शकील देखील बाद झाला. यादरम्यान मोहम्मद रिझवानने धाव घेत असताना हर्षित राणाला धक्का मारल्याचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com