RCB Victory Parade : एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे दुर्घटना, चाहत्यांच्या जल्लोष गोंधळातच खेळाडूंचा सत्कार सोहळा संपन्न
आयपीएल 2025 दरम्यान आरसीबीने पहिला विजय मिळवला, या विजयाने संपुर्ण आरसीबी फॅन्स आणि विराट कोहलीचे फॅन्स फार खुश झाले आहे. यादरम्यान आज आरसीबीच्या बसमधून त्यांची मिरवणुक काढण्यात येत आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीचा प्रकार झाला असून यात दुर्घटना झाल्या आहेत.
गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलीसांचा सोम्य लाठी चार्ज जारी करण्यात आला आहे. या चेंगराचेंगरीत 15 ते 20 जण जखमी झाले असून या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
मात्र तरी देखील चाहत्यांमध्ये एकढी चेंगराचेंगरी होत असून गोंधळ निर्माण होत आहे, तरी देखील दुसरीकडे बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडीयमवर खेळाडूंचा कर्नाटक सरकारकडून सत्कार होत आहे. पण एकिकडे हा सत्कार सुरू असताना दुसरीकडे चाहत्यांची चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. त्यामुळे तेथिल सरकारचा हा असंवेदनशिलपणा पाहायला मिळत आहे.