IPL 2025 Captain List : आयपीएलच्या 'या' संघासाठी आता नवीन कर्णधार कोण आहेत?  जाणून घ्या

IPL 2025 Captain List : आयपीएलच्या 'या' संघासाठी आता नवीन कर्णधार कोण आहेत? जाणून घ्या

आयपीएल 2025 साठी नवीन कर्णधारांची यादी जाहीर झाली आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी अक्षर पटेल, मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक पंड्या, राजस्थान रॉयल्ससाठी संजू सॅमसन आणि इतर संघांचे कर्णधार जाणून घ्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलसाठी 10 संघ सज्ज असून सरावलासुद्धा सुरुवात झाली आहे. या 18 व्या हंगामासाठी 5 संघामध्ये आता नवीन कर्णधारांची नेमणूक करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा आता अक्षर पटेलच्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया 10 संघाच्या कर्णधारांची नावे

मुंबई इंडियन्स- हार्दिक पंड्या

राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन

लखनऊ सुपर जायंट्स- ऋषभ पंत

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - रजत पाटीदार

दिल्ली कॅपिटल्स- अक्षर पटेल

सनराइजर्स हैद्राबाद- पैट कमिंस

पंजाब किंग्स- श्रेयस अय्यर

चेन्नई सुपर किंग्स- ऋतुरात गायकवाड

कोलकाता नाइट राइडर्स- अजिंक्य रहाणे

गुजरात टायटन्स- शुभमन गिल

आयपीएल 2025 मध्ये कोलकत्ता नाइट राइडर्स , रॉयल चैलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघाचे नवीन कर्णधार नावे समोर आली आहेत. आयपीएलचा १८ वा हंगाम 22 मार्चपासून सुरु होणार आहे. यावेळी आयपीएलचे सर्व सामने 13 शहरांमध्ये होणार असून पहिला सामना कोलकत्तामध्ये आहे. हा पहिला सामना कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com