युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट, पोटगीमध्ये मिळाली मोठी रक्कम
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा आता अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. 20 मार्च रोजी वांद्रे कोर्टात त्यांच्या घटस्फोटाला मंजूरी देण्यात आली आहे. धनश्री आणि युजवेंद्र हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. दरम्यान मुंबई उच्चन्यायालयाने वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाला दोघांच्याही घटस्फोटाच्या याचिकेवर निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
युजवेंद्र आणि धनश्री यांच्यामधील पोटगीच्या अटींवर अंतिम निर्णय देण्यात आला. याआधी समोर आलेल्या माहितीनुसार, धनश्रीने युजवेंद्रकडे 60 लाख रुपयांच्या पोटगिची मागणी केली होती. मात्र या वृत्तामध्ये तथ्य असल्याचे मात्र समोर आले नव्हते. अशातच आता युजवेंद्रने धनश्रीला 4.75 कोटी रुपयांची पोटगी देण्याचे मान्य केले आहे. युजवेंद्रने धनश्रीला मान्य केलेल्या रकमेपैकी 2.37 कोटी रुपये आधीच दिले आहेत. आता पोटगीची उर्वरित रक्कम घटस्फोटाच्या आदेशानंतर देण्यात येईल.
घटस्फोटाच्या आधीच युजवेंद्रचे नाव आरजे महावशबरोबर जोडले गेले. मात्र त्यांच्या त्यावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. डिसेंबर 2020 मध्ये युजवेंद्र आणि धनश्री लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नामध्ये घरातील मोजकी मंडळी उपस्थित होते.