ही मानसिक क्रुरताच; शिखर धवनच्या घटस्फोटाला न्यायालयाकडून मंजूरी

ही मानसिक क्रुरताच; शिखर धवनच्या घटस्फोटाला न्यायालयाकडून मंजूरी

दिल्लीच्या फॅमिली कोर्टाने शिखर धवनला त्याच्या पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोटास मंजूरी दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

Shikhar Dhawan Divorce : दिल्लीच्या फॅमिली कोर्टाने शिखर धवनला त्याच्या पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोटास मंजूरी दिली आहे. शिखर धवनसोबत झालेल्या अन्यायाला लक्षात घेऊन कोर्टाने हा निर्णय दिला. यामुळे 11 वर्षाचे नाते संपुष्टात आले आहे.

ही मानसिक क्रुरताच; शिखर धवनच्या घटस्फोटाला न्यायालयाकडून मंजूरी
दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल यांची 'सुवर्ण' कामगिरी

आयशाने शिखर धवनने केलेल्या आरोपांना विरोध केला नाही. न्यायाधीश हरीश कुमार म्हणाले की, आयशाने शिखर धवनला आपल्या मुलापासुन एक वर्ष दूर ठेऊन त्याला मानसिक यातना दिल्या. त्या कारणास्तव झालेला अन्याय लक्षात घेता शिखर धवनच्या घटस्फोटास मान्यता दिली.

दरम्यान, शिखर धवनने आपल्या याचिकेत अल्पवयीन मुलाची कस्टडी मागितली आहे. आपल्या मुलाचे आयशासोबत राहणे मानसिक व वैज्ञानिकदृष्ट्या हानिकारक आहे. आयशाच्या विरोधात आधीच एका गुन्ह्याची नोंद आहे हे या मागचे मुख्य कारण आहे.

आयशाने शिखर धवनशी कोट्यवधी रुपये लुटण्याच्या हेतुने लग्नास प्रवृत्त केले आणि त्याच्याविरोधात मानहानिकारक बनावट पुरावे तयार करुन ते व्हायरल करण्याची धमकी दिली. शिखर धवनचे क्रिकेट करियर व प्रतिष्ठा नष्ट करण्याचा त्या मागचा हेतू होता, असे आरोपही शिखर धवनने याचिकेत केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com