मी ऐश्वर्या रायशी लग्न केले तर...; अब्दुल रज्जाकचं वादग्रस्त विधान

मी ऐश्वर्या रायशी लग्न केले तर...; अब्दुल रज्जाकचं वादग्रस्त विधान

अनेक माजी दिग्गज खेळाडू पीसीबी आणि कर्णधार बाबर आझम यांच्यावर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : अनेक माजी दिग्गज खेळाडू पीसीबी आणि कर्णधार बाबर आझम यांच्यावर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच, एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रज्जाक याने बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनवर खळबळजनक टिप्पणी केली आहे.

अब्दुल रज्जाक याने पीसीबीवर टीका करताना त्याची ऐश्वर्या रायशी केली आहे. रज्जाक म्हणाला की, मी येथे पीसीबीच्या हेतूबद्दल बोलत आहे. जेव्हा मी खेळायचो तेव्हा मला माहित होते की माझा कर्णधार युनूस खानचा हेतू चांगला आहे. आणि त्यामुळे मला चांगली कामगिरी करण्याचा आत्मविश्वास मिळाला. इथे प्रत्येकजण पाकिस्तानच्या हेतूवर आणि संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी ऐश्वर्याशी लग्न केले तर गुणी मुलांना जन्म देईन, तर असे कधीही होऊ शकत नाही. यासाठी आपली आधी हेतू स्वच्छ पाहिजे, असे त्याने म्हंटले आहे.

दरम्यान, 2009 च्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघाचा खेळाडू शाहिद आफ्रिदीसह अनेक खेळाडू या कार्यक्रमात उपस्थित होते. रज्जाकच्या या विधानानंतर सर्वजण हसायला लागले. मात्र, यावरुन नेटीझन्स चांगलेच भडकले असून रज्जाकवर जोरदार टीका करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com