Team India T-20 Skipper Latest Update
Team India T-20 SkipperTwitter

"एका झेलमुळं वर्ल्डकप जिंकला नाही"; टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचा मुद्दा गाजला, गंभीर-पंड्याबाबत भन्नाट मिम्स व्हायरल

सोशल मीडियावर भारताच्या टी-२० संघाच्या कॅप्टन्सीचा मुद्दा खूप गाजला आहे. गंभीर आणि हार्दिकबाबत सोशल मीडियावर मजेशीर मिम्स व्हायरल झाले आहेत.
Published by :
Naresh Shende
Published on

Suryakumar Yadav Or Hardik Pandya, Team India Skipper: टी-२० वर्ल्डकप २०२४ संपल्यानंतर टीम इंडिया नवीन कर्णधाराच्या शोधात आहे. भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. त्यामुळे टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा आता नव्या खेळाडूवर सोपवली जाणार आहे. भारताचा टी-२० चा नवीन कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव प्रमुख दावेदार आहेत. सूर्यकुमारला कॅप्टन्सी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

सूर्यकुमारला कॅप्टन्सी देण्याआधी गंभीर बीसीसीआयशी चर्चा करणार आहे. सूर्यकुमार किंवा हार्दिक यांच्यापैकी कुणाला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाणार, याबाबत अधिकृत माहिती काही दिवसात जाहीर केली जाणार आहे. परंतु, सोशल मीडियावर हा मुद्दा खूप गाजला आहे. गंभीर आणि हार्दिकबाबत सोशल मीडियावर मजेशीर मिम्स व्हायरल झाले आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये हार्दिक पंड्या संघाचा उप कर्णधार होता. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला या फॉर्मेटमध्ये सूर्यकुमारला कर्णधार करायचं आहे. २०२६ च्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी, अशी इच्छा संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनीही व्यक्त केल्याचं समजते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com