क्रीडा
विरेंद्र सेहवागची ‘कू’ अॅपवर ग्रँड एंट्री
सोशल मिडीयावर नेहमी अॅक्टीव्ह असणारा भारतीय क्रिकेटपट्टू विरेंद्र सेहवाग आता 'कू' या सोशल मिडीया अॅपवर ग्रँड एंट्री घेतली आहे. कू या भारतीय सोशल मिडीया अॅपने काही वेळातच मोठी लोकप्रियता प्राप्त केली असून भारतीय राजकारण्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेक दिग्गज या सोशल मिडीया अॅपद्वारे आपल्या फॅनशी संवाद साधतात.या सर्व दिग्गजांमध्ये आता विरेंद्र सेहवागची भर पडली असून विरुने आपल्या परिचीत अंदाजात एक मज्जेदार पोस्ट करत 'कू' अॅपवर एंट्री घेतली.
चेन्नई आणि दिल्लीने प्लेऑफमध्ये एंट्री केली आणि मी कू अॅप वर एंट्री अशी मज्जेदार पोस्ट करुन विरेंद्र सेहवागने या अॅपवर पहिली पोस्ट केली. या पोस्टमधून सेहवागने युट्यूबवर ही नवी मालिका सुरु करण्याची घोषणा केली. या युट्यूब चॅनलवरुन सेहवाग आयपील मॅचचे विष्लेषण करणार आहे.