IPL 2025 Gujarat Titans : आयपीएलपूर्वी मोठी फेरफार! गुजरात टायटन्स संघाला मिळाले नवीन मालक

IPL 2025 Gujarat Titans : आयपीएलपूर्वी मोठी फेरफार! गुजरात टायटन्स संघाला मिळाले नवीन मालक

आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स संघाला नवीन मालक मिळाले!
Published by :
Team Lokshahi
Published on

आयपीएलचा 18 व्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरु यांच्यामध्ये होणार आहे. कोलकत्तामधील ईडन गार्डनच्या स्टेडियअमवर हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. आयपीएलला काही दिवस उरलेले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे 18 व्या हंगामाला पाच दिवस असताना या संघाचा मालक बदलण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलमधील संघ गुजरात टायटन्स संघाला नवीन कंपनीने विकत घेतले आहे. गुजरातमधील प्रसिद्ध उद्योजक टॉरेन्ट ग्रुपने सोमवारी गुजरात टायटन्समध्ये 67 टक्के हिस्सा मिळवला आहे. 2021 मध्ये गुजरात टायटन्स हा संघ पहिल्यांदा आयपीएलमध्ये सहभागी झाला. या संघाला सीव्हीसी कॅपिटलने 56 हजार कोटी रुपयांला खरेदी केलं होतं. 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघ आयपीएल जिंकला होता.

टॉरेन्ट ग्रुपने गुजरात टायटन्स फ्रेंचायझीमध्ये 67 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. त्यामुळे आता सीव्हीसी कॅपिटल यांच्याकडे 33 टक्के हिस्सा राहिल आहे. तसेच 12 फ्रेब्रुवारी रोजी हा व्यवहार नक्की करून घोषणा करु असे, टॉरेन्ट ग्रुपने सांगितले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com