Hardik Pandya
Hardik Pandya

घटस्फोटाच्या चर्चांनंतर हार्दिक पंड्यानं दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाला; "चांगले-वाईट दिवस..."

बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात चमदाक कामगिरी करून हार्दिकने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर हार्दिकने माध्यमांशी संवाद साधून मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :

Hardik Pandya Latest News : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट होण्याची शक्यता आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत दोघांनीही कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केली नाहीय. अशातच हार्दिकने टी-२० वर्ल्डकपच्या भारत विरुद्ध बांगलादेश या वॉर्म अप मॅचमध्ये २३ चेंडूत नबाद ४० धावा करून चाहत्यांच मन जिंकलं. हार्दिकने आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली नाही. पण बांगलादेश विरोधात झालेल्या सामन्यात चमदाक कामगिरी करून हार्दिकने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर हार्दिकने माध्यमांशी संवाद साधून मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हार्दिकने म्हटलं की, तुम्ही लढाईत टीकून राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. तुमच्या आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती येते, जिथे काही गोष्टी कठीण होतात. जर तुम्ही खेळ किंवा मैदान, म्हणजेच लढाईला सोडलं, तर तुम्हाला जे हवं आहे, ते खेळातून मिळणार नाही. तुम्ही जे शोधात आहात, ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही. मी त्याच दिनचर्येचा पालन करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याचं मी आधीपासूनच पालन करत आलो आहे. या गोष्टी होत राहतात. चांगले आणि वाटई दिवस तुमच्याकडे असतात.

हा असा टप्पा आहे, जो येतो आणि जातो. मी अनेकदा अशा परिस्थितीतून गेलो आहे आणि त्यातून बाहेर पडलो आहे. यश मिळाल्यावर मी खूप गंभीरपणे विचार करत नाही. मी जे काही चांगलं केलं आहे, ते मी लगेच विसरलो आणि पुढे गेलो आहे. कठीण काळासोबतही असंच आहे. मी कठीण काळात पळून जात नाही. पुढे जाण्यासाठी मी प्रत्येक गोष्टीचा सामना करतो. अशा परिस्थितींना स्वीकारायचं. तुम्ही केलेले अपार कष्ट कधीच वाया जात नाहीत, असंही पंड्या म्हणाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com