भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे विरजण; मात्र 'या' फोटोने जिंकली चाहत्यांची मने

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे विरजण; मात्र 'या' फोटोने जिंकली चाहत्यांची मने

आशिया कप 2023 मध्ये भारताने विरुध्द पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. परंतु, पावसाच्या कारणाने हा सामना रद्द झाला. कालच्या सामन्यातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Published on

मुंबई : आशिया कप 2023 मध्ये भारताने विरुध्द पाकिस्तान सामना खेळवण्यात आला. परंतु, पावसाच्या कारणाने हा सामना रद्द झाला. आणि दोन्ही संघांचे 1-1 गुण झाले. यानंतर आता भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये भिडण्याची शक्यता आहे. अशातच, कालच्या सामन्यातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो आहे हार्दीक पांड्या आणि पाकिस्तान खेळाडून शादाब खान यांचा.

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे विरजण; मात्र 'या' फोटोने जिंकली चाहत्यांची मने
पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द; सुपर-4मध्ये पुन्हा भिडणार?

भारतीय कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान हार्दिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. भारताच्या डावात पांड्याचे बुटाचे लेस सुटले. हे पाहून शादाब खान त्याच्या मदतीला आला. शादाबने बुटाचे लेस बांधली. हाच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होते असून शादाबने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 267 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघ 48.5 षटकात 266 धावांवर गारद झाला. मात्र त्यानंतर पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. भारताकडून हार्दिक पांड्याने 90 चेंडूत सर्वाधिक 87 धावा केल्या. याशिवाय ईशान किशनने 81 चेंडूत 81 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय हरिस रौफ आणि मोहम्मद नसीम यांना ३-३ यश मिळाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com