SA VS AFG: दक्षिण आफिक्रेने रचला इतिहास! प्रथमच अंतिम फेरीत केला प्रवेश

SA VS AFG: दक्षिण आफिक्रेने रचला इतिहास! प्रथमच अंतिम फेरीत केला प्रवेश

अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करत दक्षिण आफिक्रेच्या संघाने प्रथमच T-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळवले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

दक्षिण आफिक्रा संघाने त्रिनिदादमध्ये इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करत दक्षिण आफिक्रेच्या संघाने प्रथमच T-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळवले आहे. त्रिनिदादमध्ये आफिक्रा संघाला विजयासाठी 57 धावांचे लक्ष्य होते. जे संघाने 8.5 षटकात केवळ 1 गडी गमावून सहज गाठले. संघाकडून डावाची सुरुवात करताना रीझा हेंड्रिक्सने 25 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 29 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार एडन मार्करामने 21 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 23 धावांनी नाबाद खेळी केली. या 2 फलंदाजाशिवाय क्विंटन डी कॉकने 8 चेंडूंत 1 चौकाराच्या मदतीने 5 धावा केल्या.

अफगाणिस्तान संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आजच्या सामन्यातही त्याने विरोधी संघाला 57 धावांपर्यंत मजल मारली. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. तो अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला आणि त्याचा प्रवास आता संपला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आजच्या सामन्यात अफगाणिस्तानचा एकमेव यशस्वी गोलंदाज फजलहक फारुकी होता. त्याने आपल्या संघासाठी 2 षटके टाकली आणि 11 धावा खर्च करून 1 यश मिळविले.

सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यानसेनची 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने विरोधी संघाला सुरुवातीला मोठा धक्का दिला. त्यामुळे विरोधी संघाला शेवटपर्यंत सावरता आले नाही. संघासाठी त्याने 3 षटके टाकली आणि 16 धावा केल्या आणि 3 यश मिळवले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com