हॉटेल कर्मचाऱ्यांनी केलं विराट कोहलीच्या रुमचे व्हिडीओ शुटिंग; कोहलीचा संताप, म्हणाला...

हॉटेल कर्मचाऱ्यांनी केलं विराट कोहलीच्या रुमचे व्हिडीओ शुटिंग; कोहलीचा संताप, म्हणाला...

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. विराट दौऱ्यावर असताना त्यांच्याकडून सोशल मिडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचे कारण पण तसेच आहे. विराट ऑस्ट्रेलियामध्ये ज्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या हॉटेलमधील त्याच्या खोलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांनी केलं विराट कोहलीच्या रुमचे व्हिडीओ शुटिंग करुन ते सोशल मिडियावर शेअर केलं आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओ स्वत: विराटने देखिल त्याच्या सोशल मिडिया अकाऊंट वरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत विराटने लिहिले की, आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी तसेच त्याला भेटण्यासाठी चाहते आतूर असतात, याची मला कल्पना आहे. याबाबत काहीही गैर नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून मी नाराज झालो असून माझ्या खासगी आयुष्याबाबत मी चिंतीत आहे. माझ्या स्वत:च्या खोलीमध्येही माझा खासगीपणा अबाधित नसेल, तर मग मी खासगी जागेची अपेक्षा कुठे करावी? कोणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप करणे चुकीचे असून मला हे मान्य नाही,’ लोकांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. त्यांच्या खासगी जीवनाचा मनोरंजनासाठी वापर करू नका, अशाप्रकारे विराटने नाराजी व्यक्त केली आहे.

या व्हिडिओमध्ये विराटचे बूट, चष्मा, पकडे दिसत आहेत. या व्हिडिओवर विराटची पत्नी अनुष्का शर्मासह जगभरातील क्रिकेटपटू तसेच अभिनेता-अभिनेत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com