रोहित शर्मा ठरला नवा सिक्सर किंग; ख्रिस गेलचा मोडला रेकॉर्ड

रोहित शर्मा ठरला नवा सिक्सर किंग; ख्रिस गेलचा मोडला रेकॉर्ड

वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या होत्या.
Published on

नवी दिल्ली : वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेगवान खेळी खेळली आहे. रोहित शर्माने तिसरा षटकार मारून ऐतिहासिक विक्रम रचत नवा सिक्सर किंग ठरला आहे.

अफगाणिस्तानविरुध्दच्या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळीमध्ये 4 षटकार लगावले आहेत. या षटकारांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या आधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेलच्या नावावर होता, पण आता तो दुसऱ्या स्थानावर गेला आहे.

ख्रिस गेलने 551 आंतरराष्ट्रीय डावात 553 षटकार मारले, तर रोहित शर्माने 473 आंतरराष्ट्रीय डावात 555 षटकार ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, T20) सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू बनला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com