Ind vs Eng 4th Test |पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा

Ind vs Eng 4th Test |पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व, दिवसखेर 1 बाद 24 धावा

Published by :

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताने 1 विकेट गमावून 24 धावा केल्या आहेत.याआधी इंग्लंडचा संघाला पहिल्या डावात 205 वर ऑल आऊट केले. दरम्यान आता भारत पहिल्या डावात किती धावांचा डोंगर उभारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 205 वर ऑल आऊट झाला आहे. तर भारताची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्याच चेंडूवर भारताला धक्का बसला आहे. सलामीवीर शुबमन गिल भोपळा न फोडता माघारी परतला आहे. गिलनंतर रोहित शर्माला साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा मैदानात आला आहे. टीम इंडियाने 12 ओव्हर्समध्ये 1 विकेट गमावून 24 धावा केल्या आहेत.  खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा 8  तर चेतेश्वर पुजारा 15 धावांवर नाबाद होते.

टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडने पुन्हा एक लोटांगण घातलं आहे. भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 205 धावांवर गुंडाळलं.इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या. तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. अक्षर पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 3 बळी घेत आहेत. तसेच मोहम्मद सिराजने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

या कसोटी मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. हा चौथा सामना टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com