भारताकडून इंग्लंडला मिळालं 'हे' सोपं टार्गेट; गिल-कोहली-अय्यर ठरले फ्लॉप

भारताकडून इंग्लंडला मिळालं 'हे' सोपं टार्गेट; गिल-कोहली-अय्यर ठरले फ्लॉप

वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघ इंग्लंडसोबत सामाना होत आहे. भारताने इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Published on

लखनऊ : वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघ इंग्लंडसोबत सामाना होत आहे. भारताने इंग्लंडसमोर 230 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 9 गडी गमावून 229 धावा केल्या. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने 101 चेंडूत सर्वाधिक 87 धावा केल्या.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर शुभमन 13 चेंडूत 9 धावा करून बाहेर पडला. तर विराट कोहली एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयस अय्यरने 16 चेंडूत 4 धावा केल्या.

भारतीय संघाचे तीन खेळाडू 40 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 58 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. तर, रोहित शर्माने 101 चेंडूत सर्वाधिक 87 धावा केल्या. रोहितच्या आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. रवींद्र जडेजा 13 चेंडूत 8 धावा करून बाहेर पडला. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने शेवटच्या षटकांमध्ये महत्त्वाच्या धावा जोडल्या. सूर्यकुमार यादवने 47 चेंडूत 49 धावांची खेळी केली.

इंग्लंडच्या गोलंदाजांमध्ये आज डेव्हिड विली हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. डेव्हिड विलीने 3 भारतीय फलंदाजांना आपले लक्ष्य बनवले. याशिवाय ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांना 2-2 यश मिळाले. मार्क वुडने 1 बळी घेतला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com