Ind vs Eng; चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहची माघार, हे आहे कारण…

Ind vs Eng; चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहची माघार, हे आहे कारण…

Published by :
Published on

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आहे. या कारणामुळे त्याने कसोटी सामन्यातून माघार घेतल्याची माहिती आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांच्या टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बुमराहला आराम देण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराहने दोन सामने खेळलेअसून त्याने चार विकेट घेतल्या आहेत. दोन्ही संघातील अखेरचा कसोटी सामना 4 मार्च अर्थात उद्यापासून सुरू होणार आहे. या सामन्यात बुमराहने माघार घेतली आहे.

जसप्रीत बुमराहने लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेतली असल्याचं वृत्त बीसीसीआयमधील सुत्रांच्या आधारे समोर येत आहे. बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं. "लग्न करणार आहे आणि लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी हवीये" असं बुमराहने बीसीसीआयला कळवलं होतं अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

सध्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. भारताने हा सामना जिंकल्यास टीम इंडिया ही मालिका 3-1 अशा फरकाने खिशात घालेल.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com