IND vs NZ 2026
IND VS NZ 2026 ODI SERIES: SHUBMAN GILL NAMED CAPTAIN, SHREYAS IYER RETURNS AS VICE-CAPTAIN

IND vs NZ : बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियात नवा कर्णधार जाहीर

ODI Series 2026: बीसीसीआयने IND vs NZ 2026 वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

टीम इंडियाने २०२६ च्या पहिल्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडविरुद्धच्या संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआय निवड समितीने मालिकेला आठ दिवस आधी हा १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला. उभयसंघात तीन सामने खेळवले जातील, ज्याला ११ जानेवारीपासून सुरुवात होईल. क्रिकेटप्रेमींना गेल्या अनेक दिवसांपासून या संघाची वाट पाहत होती, आणि आता बीसीसीआयने ही उत्सुकता संपवली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेसाठी कर्णधार बदलण्यात आला आहे.

एकदिवसीय संघात शुबमन गिल कर्णधार म्हणून परतला आहे, तर श्रेयस अय्यर उपकर्णधारपदी कमबॅक झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झालेल्या शुबमनला आता नेतृत्वाची जबाबदारी मिळाली आहे. श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतित झाला होता, आणि आता त्याचे पुनरागमन झाले आहे. मात्र, श्रेयस खेळेल का हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची मालिका भजावली होती, आता शुबमनकडे धुरा सोपवली गेली आहे.

शुबमन-श्रेयस व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा एकदा संधी मिळाली नाही. शमीच्या चाहत्यांना निराशा झाली असून, त्याच्या भविष्यातील संधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मालिकेचे वेळापत्रक असे आहे

पहिला सामना ११ जानेवारीला बडोद्यात

दुसरा १४ जानेवारीला राजकोटमध्ये

तिसरा-अंतिम सामना १८ जानेवारीला इंदूरमध्ये खेळला जाईल.

Summary
  • शुबमन गिल वनडे संघाचा नवा कर्णधार, श्रेयस अय्यर उपकर्णधार

  • मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी संघात परतले

  • मोहम्मद शमीला संधी मिळाली नाही, चाहत्यांमध्ये निराशा

  • मालिकेचे वेळापत्रक: ११ जानेवारी बडोदा, १४ जानेवारी राजकोट, १८ जानेवारी इंदूर

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com