आशिया चषकात IND VS PAK पुन्हा थरार, या दिवशी होणार भारत-पाक सामना
क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आशिया कप 2023 चे फायनलसह सुपर-4 चे सर्व सामने श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे होणार होते. पण आता हे सामने स्थलांतरित झाल्याच्या बातम्या येत आहेत. हे सामने हंबनटोटा येथे होणार आहेत. पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
आशिया कप 2023 मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) स्पर्धेच्या मध्यावर एक मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या कोलंबो येथे होणाऱ्या अंतिम सामन्यासह सुपर-4 टप्प्यातील सर्व सामने हंबनटोटा येथे हलवण्यात आले आहेत.
या सामन्यांसाठी पल्लेकेले आणि दाम्बुला या स्थळांचाही विचार केला गेला. मात्र आता कोलंबोतील सर्व सामने हंबनटोटा येथे हलवण्यात आले आहे. कोलंबोमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील काही दिवस येथे सतत पाऊस पडेल. यामुळेच एसीसीने सर्व सामने कोलंबोला हलवले आहेत.

आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी (२ सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगला. पण पल्लेकेले स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात फक्त भारतीय संघच फलंदाजी करू शकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, मात्र संघाने २६६ धावा केल्या होत्या.
आता भारतीय संघ सोमवारी (४ सप्टेंबर) नेपाळविरुद्ध दुसरा सामना खेळत आहे. या सामन्यात नेपाळने २३१ धावांचे लक्ष्य दिले आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया हा सामना जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास सुपर-4 साठी पात्र ठरेल. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना १० सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये होणार होता. मात्र आता तो हंबनटोटा येथे खेळला जाणार आहे.