भारतीय गोलंदाजांनी मोडलं दक्षिण आफ्रिकेचं कंबरडं; अर्शदिप, आवेशची चमकदार कामगिरी

भारतीय गोलंदाजांनी मोडलं दक्षिण आफ्रिकेचं कंबरडं; अर्शदिप, आवेशची चमकदार कामगिरी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे खेळला जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण अफ्रिकेने गुडघे टेकले आहेत.

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे खेळला जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण अफ्रिकेने गुडघे टेकले आहेत. टीम इंडियाच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 116 धावांत गुंडाळला. विजयासाठी भारतापुढे आता 117 धावांचे लक्ष्य आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या वेगवान गोलंदाजांना सुरुवातीपासूनच खेळपट्टीची चांगली मदत मिळाली. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला (0) बोल्ड केले. अर्शदीपने पुढच्याच चेंडूवर रॅसी व्हॅन डर डुसेनलाही (0) तंबूत परत पाठवले.

यानंतर टोनी डी जॉर्जी आणि एडन मार्कराम यांनी काही काळ दक्षिण आफ्रिकेचा डाव सांभाळला. मात्र, टोनीला (28) आणि हेनरिक क्लासेन (6) यांनाही अर्शदीपने बाद केला. अशा प्रकारे अर्शदीपने पहिले चार मोठ्या विकेट घेतल्या.

यानंतर आवेश खानच्या गोलंदाजीनेही चमक दाखवली. आवेशने एडन मार्करामला (12) बोल्ड केले. तर, आवेशने पुढच्याच चेंडूवर वियान मुल्डरला (0) एलबीडब्ल्यू केले. यानुसार दक्षिण अफ्रिका संघाने एकूण 58 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. दरम्यान, भारताकडून अर्शदीपने पाच आणि आवेश खानने चार आणि कुलदीप यादवने एक विकेट घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com